मुंबईमध्ये घरगुती गणपती आणि गौरी-गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता अनेक मुंबईकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देण्यासाठी बाहेर पडतात. दक्षिण मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी धूम असते. लालबाग भागात असणार्या लालबागचा राजा या नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असणार्या या गणपतीला देखील गर्दी वाढते. नवसाची आणि मुखदर्शनाची अशा दोन वेगवेगळ्या रांगांमध्ये भाविक तासन तास उभे राहून गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोरही वाढला आहे. त्यामुळे चिंचोळ्या गल्लीत पावसात भिजत लालबागच्या राजाचं दर्शन घेणं तुम्हांला शक्य नसल्यास आता ऑनलाईन माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेणं शक्य आहे. यामध्ये फेसबूक, ट्वीटरसह युट्युब चॅनल आणि अधिकृत वेबसाईटवरही 24 तास लालबागच्या राजाचे दर्शन घेणं शक्य आहे. Lalbaugcha Raja 2019 Live Darshan Online: लालबागच्या राजाचं घरबसल्या मोफत दर्शन घेण्यासाठी युट्युब, फेसबूक, ट्वीटर सह Android आणि iOS Mobile App च्या या लिंकवर क्लिक करा आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा
आत्तापर्यंत अजिंक्य रहाणे, शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर यांच्या सोबतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील महाराष्ट्र दौर्यावर असताना मुंबईत गणेश चतुर्थी दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लालबागच्या राजाला सामान्यां इतकीच सेलिब्रिटींमध्येही क्रेझ आहे. अनेक दिग्गज मंडळी नित्यनियमाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.
लालबागच्या राजाचं इथे पहा लाईव्ह मुखदर्शन
लालबागच्या राजाचं लाईव्ह मुखदर्शन मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.दिवसातून दोन वेळेस लालबागच्या राजाची आरती होते. दुपारी12.30 आणि रात्री 8.30 वाजता बाप्पाची आरती होते. 11 सप्टेंबर 2019 रात्री 12 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं दर्शन रांगेमधून घेता येणार आहे.