देशभरात गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामध्येच मुंबईमधील प्रसिद्ध 'लालबागाचा राजा' (Lalbaugcha Raja ) याच्या पायावर माथा टेकवण्यासाठी दूरदूर वरुन लोक त्याच्या दर्शनासाठी येतात. तसेच लालगाबच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी बरेच तास रांग लावताना दिसतात. मात्र रांग लावून सुद्धा लालबागच्या राजाचे मनासारखे दर्शन न झाल्यास भक्तांमध्ये नाराजगी दिसते. परंतु लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी खास त्यांच्या मंडळाकडून लाइव्ह आरती, दर्शन आणि आरास नागरिकांना एका क्लिकवर पाहता येणार आहे.
लोअर परळ पासून ते लालबाग पर्यंतच्या विभागात गणपती पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते. दिवस असो वा रात्र नागरिक मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. मात्र लालबाग मधील नवसाला पावणारा गणपती म्हणून ओखळ असणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक दिसून येतात. तर लालबागच्या राजाचा थाट अगदी नीट पाहिल्यास तो बोलक्या स्वरुपाचा दिसून येतो. त्यामुळे आता जर तुम्हाला घरबसल्या लालबागचा राजाचे दर्शन घ्यायचे असल्यास येथे पहा.(Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती मंदिर, वैशिष्ट्ये आणि स्थळ; घ्या जाणून)
इथे घेऊ शकाल लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन –
यंदा लालगबाचा राजासाठी चांद्रयानचा देखावा उभारण्यात आला आहे. तसेच राजाचे दर्शन घेण्यासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आवर्जून आपली उपस्थितीत लालबाग परिसरात दर्शवतात. एवढेच नाही नागरिकांची सुरक्षितता सुद्धा लक्षात घेता मंडळाचे कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस ही सतर्कतेने गणेश चतुदर्शी पर्यंत आपले काम चोख पार पाडण्याचे प्रयत्न करत असतात.