
लक्ष्मीपूजन (Laxmi Pooja) केल्याशिवाय दिवाळी सण पूर्णच होत नाही. दीपावली (Deepavali 2021) सणात लक्ष्मीपूजन (Laxmi Pooja 2021) हा एक महत्त्वाचा दिवास. संपूर्ण वर्षभरात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मीपूजनादिवशी लक्ष्मी आणि गणपतीचे पूजन केले जाते. या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असते. सर्व नातेवाईक कुटुंबातील सदस्य एकत्र आलेले असतात. एकूणच वातावरण मंगलमय झालेले असते. लोक एकमेकांना शुभेच्छा देत असतात. अशा या मंगल दिवशी आपणासही एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे खास HD Greetings, Wallpapers, Wishes देत आहोत. ज्या मोफत डाऊनलोड करुन आपण त्या इमेज विविध माध्यमातून शेअर करु शकता.
मानले जाते की, गणपती ही बुद्धीची देवता आहे. हिंदू धर्मात कोणतीही पूजा गणपतीच्या पूजेशिवाय सुरु होत नाही. दिवाळीतही गणपतीची पूजा केली जाते. गणपतीसोबतच लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते. त्यामुळे या दिवशी पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते अशी अख्याईका आहे. त्यामुळे लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी येईल आणि तिच्या सोबतच गणपतीची पूजा केली तर धनप्राप्ती झाल्यावर ते धन कसे वापरायचे याची माहिती संबंधित मनुष्यास मिळेल असा समज समाजात रुढ आहे.





लक्ष्मीपूजनाचा विधीही ठरलेला असतो. सांगितले जाते की, सर्वात सुरुवातीला आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या व्रताचा संकल्प करायला हवा. त्यानंतर दिवाळी दिवशी आपण भगवान कुबेर, भगवान गणेश, लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती यांची पूजा करायला हवी. लक्ष्मीभक्तांनी 'ॐ श्री श्री नमः' हा मंत्र एकाग्रतेने सलग 11 वेळा उच्चारायला हवा. तसेच, लक्ष्मीजवळ एक नारळ 11 कमळाची फुले आणि देवी स्त्रोत्र मह्णायला हवे.