Ajaz Khan | (Photo Credit- X)

Web Series News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उल्लू अॅपवर (Ullu App) प्रसारित होणाऱ्या वादग्रस्त वेब शो हाऊस अरेस्ट (House Arrest Show) मध्ये सहभागी असलेल्या अभिनेता अजाज खान (Ajaz Khan), निर्माता राजकुमार पांडे (Rajkumar Pandey) आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शोमधील अश्लील कंटेंट आणि महिलांचे कथित अश्लील चित्रण याबद्दलच्या तक्रारींनंतर हा एफआयआर (Obscene Content FIR) दाखल करण्यात आला आहे. अंबोली पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, बजरंग दलाशी संबंधित कार्यकर्ते गौतम रावरिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई पोलिसांनी पुष्टी केली की विश्व हिंदू परिषदेनेही आक्षेप घेतला आहे.

लैंगिक दृश्ये, अश्लील भाषा?

उल्लू अॅपवरवरील वादग्रस्त हाऊस अरेस्ट या वेब शोमध्ये लैंगिकदृष्ट्या सूचक दृश्ये दाखवल्याचा आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप आहे, ज्याचे क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये, एजाज खान स्पर्धकांवर - त्यापैकी अनेक महिलांवर - कॅमेऱ्यासमोर अंतरंग कृत्ये करण्यासाठी आणि अश्लील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी दबाव आणताना दिसत आहे. (हेही वाचा, House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स)

पोलिसांकडून एफआयआर आणि दाखल आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज खान याच्याविरोधात दाखल एफआयआरमध्ये खालील आरोप आणि त्यावर बीएनएस अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 296,3 (5)
  • माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 67 आणि 67(A)
  • महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 4, 6 आणि 7

हाऊस अरेस्ट म्हणजे अश्लीलतेचे प्रतीक: चित्रा वाघ

अंबोली पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीत शोच्या अश्लीलतेबद्दल आणि प्रेक्षकांवर त्याचा नकारात्मक परिणाम याबद्दल चिंता व्यक्त करणारे नागरिकांकडून अनेक तक्रार मिळाल्याचा उल्लेख आहे. या घटनेमुळे राजकीय संतापही निर्माण झाला आहे. महाराष्ट्र भाजप एमएलसी चित्रा वाघ यांनी या कार्यक्रमास 'अश्लीलतेचे प्रतीक' असे म्हणत 'हाऊस अरेस्ट'वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना अशी सामग्री देणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोबाइल अॅप्सवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा, Obscene Content On Social Media, OTT: अश्लील कंटेंट प्रसारण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्र सरकार, ओटीटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस.  )

एजाज खान याच्या अडचणी वाढल्या

वाघ यांनी म्हटले आहे की, 'स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानने एक असा शो तयार केला आहे जो अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह आहे. अशी सामग्री आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे आणि ती मुलांसाठी आणि समाजासाठी हानिकारक आहे'.

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या वादाची दखल घेतली आणि अभिनेता एजाज खान आणि उल्लू अॅपच्या सीईओ विभू अग्रवाल यांना समन्स बजावले आणि शोमधील व्हायरल क्लिप्सबद्दल स्पष्टीकरण मागितले.