Mahavatar Poster (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mahavatar Poster: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) ने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट दिला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाने जगभरात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. एवढेच नाही तर 'छावा' या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. तसेच, विकी कौशलने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. पण आता विकी कौशल लवकरच अशाच आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. त्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे पात्र भगवान विष्णूचे अवतार असलेल्या ऋषी परशुराम यांचे असणार आहे. या चित्रपटाचे नाव 'महावतार' (Mahavatar) आहे. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार नाही पण पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

निर्माता दिनेश यांच्याकडून अपडेट -

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजयन करत आहेत. अलीकडेच निर्माता दिनेश यांनी वेव्हज 2025 समिटला हजेरी लावली, जिथे त्यांनी चित्रपटाबद्दल अपडेट दिले. ज्यामध्ये दिनेशने सांगितले की 'महावतार' हा मॅडॉक फिल्म्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

महावतार चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल -

विकी कौशल स्टारर 'महावतार' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा विकी कौशल एका दमदार अवतारात परतत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती चांगली कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे.