Nashik Accident News: नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 23 वर्षीय तरुणीने त्यांची दुचाकी आणि पीकअप वाहनाच्या अपघातात जीव गमावला (Nashik Road Accident) आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जयश्री सोनवणे असं मृत 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती आपला भाऊ सुमितसोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीकअप वाहनाने रस्त्यावरील तीन दुचाकी, एका कारसह इतर दोन वाहनांना जोरदार धडक दिली. यात जयश्री आणि सुमितच्या दुचाकीचा देखील समावेश होता. ही धडक इतकी भयंकर होती की यात जयश्रीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात भाऊ सुमित हा देखील गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमितची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकमध्ये पीकअप वाहन आणि दुचाकी अपघातात तरूणीचा मृत्यू
नाशकात भावाच्या डोळ्यादेखत भररस्त्यात तरुणीचा मृत्यू pic.twitter.com/fuXggNpAbP
— News18Lokmat (@News18lokmat) May 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)