Happy Kojagiri Purnima Photos in Marathi: सजग करणारी कोजागिरी अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. कोजागिरी निमित्त चंद्राचे रुप दूधात पाहुन त्याचे सेवन करण्याची पद्धत पुर्वापार पासून सुरु आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर स्पष्ट दिसणारे चंद्राचे पूर्ण गोल आणि तेजोमय रुपाचे दर्शन घेण्यासाठी या सणाचे प्रयोजन असावे. आपले सण अर्थपूर्ण आणि मन प्रसन्न करणारे आहेत. कोजागिरी सणानिमित्त एकत्र जमून दुधात चंद्रदर्शन घेऊन दूध सेवनाच्या परंपरेत यंदा कोविड-19 संकटामुळे खंड पडण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून अगदी सहज एकमेकांशी कनेक्ट होऊ शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे संदेश, Wishes, Messages, SMS, Images आणि शुभेच्छापत्रं. हे संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) अशा माध्यमातून तुम्ही शेअर करु शकता.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी 'को जागर्ति?' असे म्हणत सर्वत्र संचार करते असा समज आहे. याचा अर्थ कोण जागं आहे. जो दक्ष, जागृक, सजग आहे त्याला लक्ष्मी देवी प्रसन्न होते. त्यामुळेच कोजागिरीच्या रात्री जागराची प्रथा पडली असावी. मात्र येथे जाणं असणं म्हणजे स्वतःच्या कामाप्रती दक्ष असणं, असा आहे. (कोजागिरी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा संदेश, Messages, GIFs शेअर करत साजरा करा शरद पौर्णिमेचा आनंद!)
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा!
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
निरभ्र आकाशात चंद्राचे विलोभनीय रुप पाहणे हा एक आनंददायी क्षण आहे. त्यामुळे आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो. त्याचबरोबर त्यामागे शास्त्रीय कारणही आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची किरणं अमृतयुक्त असल्याने आरोग्यदायी असतात. त्यामुळेही चंद्रदर्शन, दूध सेवनाची प्रथा पडली असावी. यंदाची कोजागिरी तुम्हीही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाने साजरी करा. लेटेस्टली मराठी कडून कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!