
Happy Kojagiri Purnima Images In Marathi: श्रावणानंतर सुरु झालेल्या सणांच्या लांबच लांब रांगेत एक छोटासा, लाडका आणि उत्साही सण येतो. तो म्हणजे 'कौजागिरी पौर्णिमा.' अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्राचे प्रतिबिंब केशरयुक्त दूधात पाहुन त्याचा आस्वाद घेतला जातो. म्हणून यास 'कौमुदी पौर्णिमा' असेही म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचे चांदणे. मोकळ्या अंगणात किंवा शहरांमध्ये सोसायटीच्या गच्चीत कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह साजरा केला जातो. मात्र यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणे, गर्दी करणे टाळलेलेच बरे. परंतु, सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, प्रियजनांवर नक्कीच करु शकता. यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, wishes, Messages, GIF's सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यावरुन शेअर करुन देऊ शकता. (Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागिरीच्या रात्री असे बनवा 'कोजागिरी स्पेशल मसाला दूध' जाणून घ्या सोपी रेसेपी)
आपल्या सणांना जसं धार्मिक अंग आहे तसंच शास्त्रीय कारणं देखील आहेत. विशेष म्हणजे या सणांमागे विशेष अर्थ दडला आहे. प्रतिपदेपासून कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राचे पूर्ण गोल आणि तेजोमय रुप पौर्णिमेला दिसते. परंतु, या पौर्णिमेला विशेष महत्त्व का? तर आश्विन महिन्यापूर्वी आषाढ, श्रावण, भाद्रपद हे तीन महिने पावसाचे असतात. या काळात चंद्राचे लोभस रुप, टिपुरं चांदणं याचा अनुभव ढग दाटून आल्याने घेता येत नाही. मात्र आश्विन महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने आकाश निरभ्र असते. त्यामुळे चंद्राच्या विलोभनीय रुपाचे दर्शन घेता येते. हा सुखद अनुभव मन प्रसन्न करतो आणि निसर्गाच्या अधिक जवळ नेतो. तसंच या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृतमय गुण असतात असे मानले जाते. त्यामुळे चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवलेल्या दूधाचे सेवन आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं. (Kojagiri Purnima 2020 Messages: कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, Images, SMS, Quotes शेअर करत मित्र मंडळींसाठी खास करा शरद पौर्णिमेची रात्र)
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढु द्या नात्याचा
त्यात असु दे गोडवा साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी...
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात
वाढवू ऋणानुबंधाचा हात
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे जागरुकतेचे वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

GIF's
कोजागिरी पौर्णिमा सजगतेचा संदेश देते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी 'को जागर्ति?' असे म्हणते. म्हणजे कोण जागं आहे ? जाणं असणं म्हणजे दक्ष असणं, सजग असणं. जो जागा आहे, जागृत आहे त्याला लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असे मानले जाते. जाणं असणं म्हणजे स्वतःच्या कामाप्रती दक्ष असणं. स्वतःचा विकास करण्यासाठी जागरुक, सजग असणं. अशा व्यक्तीला लक्ष्मी देवी नक्कीच पावेल. यंदाच्या कोजागिरी निमित्त आपले जीवन कला, विद्या आणि अनुभवाने अधिक सजग करुया आणि चंद्राच्या तेजाप्रमाणे मन प्रफुल्लित करुया.