आश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमेचे व्रत केले जाते. या दिवसाला कोजागिरी पौर्णिमादेखील (Kojagiri Purnima 2022) म्हणतात. यंदा 9 ऑक्टोबर रोजी देशभरात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आकाशात 16 कलांनी भरलेला असतो आणि अमृतवर्षाव करतो. म्हणूनच या रात्री दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घातल्या जातात व या दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडल्यानंतर ते प्राशन केले जाते. काही ठिकाणी खीर बनवून ती या रात्री खुल्या आकाशाखाली ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीला नैवेद्य दाखवून तिचा प्रसाद वाटला जातो.
शरद पौर्णिमेला मध्यरात्री लक्ष्मीची पूजा केली जाते, जिला कोजागर पूजा म्हणतात. असे म्हटले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर भ्रमण करण्यास निघते. या दिवशी लक्ष्मी आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते. धार्मिक ग्रंथानुसार, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथन केल्यावर देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, त्यामुळे या दिवशी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
तर अशा या खास दिवशी मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, अश्विन शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा 9 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 03:41 पासून सुरू होईल. पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल. (हेही वाचा: यावर्षी कोजागरी पौर्णिमा कधी आहे? शरद पौर्णिमेची तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या)
आरोग्याच्या दृष्टीनेही ही पौर्णिमा महत्वाची मानली आहे. असे सांगतात की, शरद पौर्णिमेच्या चंद्रकिरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात. शरद पौर्णिमेच्या रात्रीपासून कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत दिवा लावून दीपदानाचा महिमा आहे. दिव्याचे दान केल्याने घरातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.