
Prabodhini Ekadashi 2019 Messages and Wishes In Marathi: आज संपूर्ण महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) साजरी होत आहे. वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणजे मोठा सोहळा असतो. आषाढी एकादशीपासून चार महिने निद्रीस्त अवस्थेमध्ये असलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशी दिवशी उठवतात आणि पुन्हा नव्या, शुभ कार्यांना सुरूवात होते. कार्तिकी एकादशीनिमित्त अनेकजण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारा कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा, देव उठनीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करत असतात. तुम्हालाही तुमच्या मित्रपरिवाराला कार्तिकी एकादशीनिमित्त खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस पाठवायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी...(हेही वाचा - Kartiki Ekadashi 2019 HD Images: कार्तिकी एकादशी निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा!)
वारकरी संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. कार्तिकी एकादशी दिवशी आषाढीपासून सुरू झालेला चातुर्मास संपतो. त्यामुळे वारकरी बांधव विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरामध्ये दाखल होतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमाभागावरील प्रांतातही भाविक हा कार्तिकी एकादशीचा सण साजरा करतात.
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेछा!

पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मज
कार्तिकी एकादशी विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!




कार्तिक शुक्ल एकादशी दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरात दाखल होतात. पण यंदा तुम्हांला पंढरपुरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल तर डिजिटल मीडियाच्या सोशल मीडियावर फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशी अनेक माध्यमं खुली आहेत. त्याच्या माध्यमातून विठू रायाच्या भक्तांना शुभेच्छा देऊन प्रबोधिनी एकादशीचा सोहळा साजरा करा.