
Kartiki Ekadashi 2019 HD Images: वारकरी संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. यावर्षी ही कार्तिकी शुद्ध एकादशी 8 नोव्हेंबर 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशी दिवशी आषाढीपासून सुरू झालेला चातुर्मास संपतो. त्यामुळे वारकरी बांधव विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरामध्ये दाखल होतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमाभागावरील प्रांतातही भाविक हा कार्तिकी एकादशीचा सण साजरा करतात. कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi)म्हणूनदेखील ओळखली जाते. आपल्या मित्र परिवाराला कार्तिकी एकादशीनिमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन शुभेच्छा द्या !





कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचं रूप असलेला विठूराया चातुर्मास संपवून उठतात. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सर्व भक्त उपवास करतात. संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. या दिवशी पंढरपूरात भक्तांची एकच गर्दी पाहायला मिळते. तसेच ज्या भक्तांना पंढरीला जाणं होत नाही ते आपल्या जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतात.