विठ्ठल-रुख्मिणी (Photo Credit - youtube)

Kartiki Ekadashi 2019 Marathi Abhang: आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi ) निमित्ताने अवघ्या देशभरातून वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या भक्तसमुदयात वारकरी, टाळकरी, माळकरी संत-महंत व सामान्य भक्त या सर्वांचा समावेश आहे. अनेक वारकरी आषाढी तसेच कार्तिकी एकादशीनिमित्त पायी पंढरपूरची वारी करतात. येवढ्या लांबचे अंतर कापताना त्यांना कोणताही थकवा जाणवत नाही. कारण, त्यांच्या तोंडातून सतत विठूरायाचा नामघोष सुरु असतो. विठूरायाचे खास अभंग गात हे वारकरी एक-एक पाऊल टाकत असतात. काही वारकरी एकादशीनिमित्तच नव्हे तर दररोज सकाळी विठ्ठलाचे अभंग ऐकतात. हे अभंग ऐकल्यानंतर त्यांच्यात वेगळीच उर्जा निर्माण होते. तुम्हालाही आज विठूरायाचे खास मराठी अभंग ऐकायचे असतील, तर खालील व्हिडिओ नक्की पाहा. (हेही वाचा - Kartiki Ekadashi 2019 Wishes and Messages: कार्तिकी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून शेअर करून द्या विठू भक्तांना देव उठनी एकादशीच्या शुभेच्छा)

वारकरी भक्तगणाला पांडुरंग लोकगीतांतून देखणा वाटतो. विठ्ठलाच्या रुपावरून त्यांच्यावर अनेक अभंग, गीत, कविता रचन्यात आल्या आहेत. या अभंगामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचे वर्णन करण्यात आले आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...! हा संत तुकारामांचा अभंग एकदा ऐकला की, कोणीही तो दिवसभर गुणगुणतो. चला तर जाणून घेऊयात अशा खास मराठी अभंगाविषयी...

विठ्ठलाचे खास मराठी अभंग -

आज संपूर्ण पंढरी विठ्ठलनामाने दूमदूमली आहे. पहाटेपासून वारकऱ्यांची चंद्रभागेत स्नान करण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. आषाढी एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची पूजा केल्यानंतर आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय पूजा केली. पाटील यांनी विठूरायाला महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी सुखी राहू दे. बिघडलेलं ऋतूचक्र पुन्हा सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे.