1999 मधील भारत-पाक युद्धातील महत्त्वाचा दिवस म्हणजे 26 जुलै. भारतीय जवानांनी दुर्गम भागामध्ये जाऊन पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजले. या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी या विजयी मोहिमेची आठवण ठेवत जवानांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सोशल मीडीयातही फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर वरून खास मेसेजेस, Wishes, Greetings, Quotes शेअर करून हा दिवस जवानांसाठी खास करा.
74 दिवसांच्या युद्धानंतर पाक सैन्यावर भारतीय लष्कराने मात केली होती. या शौर्याचं प्रतिक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 26 जुलैचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. नक्की वाचा: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाचा इतिहास, जाणून घ्या.
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा
कारगिल विजय दिवशी भारताचे पंतप्रधान इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. तसेच या दिवसाचं औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची देखील पद्धत आहे.