
भारत- पाकिस्तान मध्ये 1999 मध्ये झालेल्या युद्धात भारतीय लष्काराने दुर्गम भागात जाऊन पाकिस्तानी सैन्याला नामोहरम केले होते. या युद्धात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या सन्मामार्थ 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. यंदा 23वा कारगिल विजय दिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या जिगरबाज वृत्तीला सलाम केला जातो. मग सोशल मीडीयातही फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर वरून खास मेसेजेस,Wishes, Greetings शेअर करून हा दिवस साजरा करा. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज डाऊनलोड करून तुम्ही सहज शेअर करू शकता.
1999 साली सलग 74 दिवसांच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत हरवले होते. या शौर्याचे प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 26 जुलैचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती. यंदा भारत 23 वा कारगील दिवस साजरा करत आहे. हे देखील नक्की वाचा: Kargil Vijay Diwas 2022 Date and History: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाचा इतिहास, जाणून घ्या.
कारगिल दिवसाच्या शुभेच्छा





कारगिल दिवसाच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. यावर्षी कारगिल विजय दिवसानिमित्त युद्धस्मारकावर ध्वजारोहण समारंभासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असुन स्मृतीस्थळावर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.