Happy Janmashtami 2019 HD Images: गोकुळाष्टमीच्या दिवशी खास HD Photos, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! (File Photo)

Happy Janmashtami 2019 Images and Wallpapers in Marathi: श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हाच दिवस सर्वत्र जन्माष्टमी (Krishna Janmashtami), कृष्ण जन्मदिवस अथवा गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 23 ऑगस्ट रोजी हा उत्सव साजरा होईल. अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या सणाची धामधूम दिसून येते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यात बाळकृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाचा आवडता पदार्थ काला खाऊन उपवास सोडतात.

भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या पाच ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. इतर ठिकाणीही पूजा अर्चा, कथाकथन, दहीहंडी अशा धार्मिक कार्यांसह हा सण साजरा होतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी होतात. तर असा हा खास गोकुळाष्टमी दिवस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers, Photos शेअर करून साजरा करा. (हेही वाचा: Dahi Handi 2019: जाणून घ्या का साजरा केला जातो 'दहीहंडी'चा उत्सव; या दिवसाचे महत्व आणि इतिहास)

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ मेसेज 

दरम्यान, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला 28 व्या युगात देवकीच्या पोटी श्रीकृष्ण जन्मले होते असे ब्रह्मपुराणात सांगितले आहे. श्रीकृष्णाला विष्णूचा आठवा अवतार समजले जाते. गोकुळाष्टमी या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे यादिवशी व्रत-वैकल्य, पूजा-उपवास यांचे फळ नेहमीपेक्षा जास्त मिळते असा समज आहे.