Iskcon Juhu Janmashtami 2019 Live Streaming: इस्कॉन जन्माष्टमी 2019 कृष्ण जन्मोत्सव इथे पहा लाईव्ह
Iskcon Juhu (Photo Credits: Instagram)

 Iskcon Juhu Darshan Live Streaming: महाराष्ट्रात 23 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव (Shri Krishna Janmotsav) साजरा केला जाणार आहे.  जन्माष्टमीनंतर गोपाळकाल्याचा (Gopalkala) सण साजरा केला जातो. जगभरात कृष्णाचा महिमा पोहचवण्यासाठी इस्कॉन मंदिरं ( Iskcon Temple) उभारण्यात आली आहेत. यामधील काही मंदिरं भारतामध्येही आहेत. मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीचं मुंबई जुहू (Juhu) येथील इस्कॉन मंदिरातील सेलिब्रेशन तुम्ही घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यंदा इस्कॉन मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा 24 ऑगस्ट दिवशी रंगणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून त्याचं लाईव्ह प्रसारण दाखवलं जाणार आहे.

इस्कॉन मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव खास पद्धतीने साजरा केला जातो. इस्कॉन मधील अनुयायी जगभर भगवतगीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात. भारतामध्ये बेंगलोर येथील इस्कॉन मंदिर सर्वात भव्य आहे. अमेरिकेमध्ये पहिलं इस्कॉन मंदिर 1966 साली बांधण्यात आलं. आता जगभरात सुमारे 400 मंदिरं आहेत. मुंबईत 1978 साली इस्कॉन मंदिर सुरू करण्यात आले.

कुठे पहाल इस्कॉन मंदिरातील सोहळा?  

इथे पहा इस्कॉन मंदिरातील सोहळ्यातील कृष्णजन्मोत्सव सोहळा.  सोशल मीडियाप्रमाणेच आता टेलिव्हिजनवरही संस्कार टीव्हीवर इस्कॉन मंदिरातील सोहळा पाहता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला खास वेशभूषेमध्ये सजवून पाळण्यात ठेवले जाते. पाळणा गायला जातो त्यानंतर विधीवत पूजा करून बाळकृष्णाची पूजा केली जाते.