Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 6 (Photo Credit _ File Image)

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi: दरवर्षी शारदीय नवरात्री (Sharadiya Navratri 2024) ची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला होते. यंदा नवरात्री (Navratri 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 11 ऑक्टोबरला संपणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला मातेला निरोप दिला जाईल आणि विजयादशमी (Vijayadashami 2024) चा सण साजरा केला जाईल. यंदा माँ दुर्गा पालखीवर स्वार होऊन येणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या मंदिरांमध्ये विशेष तयारी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक आपल्या घरी घटस्थापना किंवा कलशाची स्थापना करतात. तसेच आपल्या घरी माता दुर्गाचे दर्शन घेण्यासाठी मित्र-परिवाराला घरी दर्शनासाठी बोलतात. शारदीय नवरात्रीमध्ये मातेची यथायोग्य पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि समृद्धी नांदते.

शारदीय नवरात्रीला, माता दुर्गा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे सार्वजनिक पंडाल आणि घरांमध्ये मोठ्या थाटामाटात दुर्गा मातेचे स्वागत केले जाते. प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि माँ दुर्गेच्या मूर्तींचे स्वागत केले जाते. तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवरात्रि निमित्त माता की चौकी, कन्या पूजन किंवा जागरणाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवून शकता. यासाठी तुम्हाला खालील मेसेज, ईमेज नक्की उपयोगात येतील. तुम्ही या ईमेज मोफत डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. (हेही वाचा - Shardiya Navratri 2024 Ghatasthapana Muhurat: घटस्थापना कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)

नवरात्रीतील 'माता की चौकी' चं आमंत्रण -

माता की चौकी

यंदा नवरात्री दरम्यान आमच्या घरी

महाष्टमी दिवशी 'माता की चौकी' चं

आयोजन करण्यात आलं आहे.

तरी आपण हजेरी लावावी.

स्थळ-

तारीख-

वेळ -

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 1 (Photo Credit _ File Image)

नवरात्री मध्ये महाअष्टमी च्या दिवशी आमच्या घरी 'माता की चौकी' चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आपण यामध्ये सहभागी व्हावं ही अपेक्षा

स्थळ-

तारीख-

वेळ-

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 2 (Photo Credit _ File Image)

नवरात्री मध्ये यंदा ..... संकुलामध्ये भोंडला चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी पारंपारिक मराठी वेशभूषेमध्ये तुम्ही तुमच्या सख्या-सवंगड्यांसोबत या खेळामध्ये सहभागी व्हावं हे आग्रहाचं निमंत्रण

स्थळ-

तारीख-

वेळ-

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 3 (Photo Credit _ File Image)

आमच्या येथे महाष्टमी दिवशी कन्यापूजन आणि माता की चौकी चं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये आपल्या लेकींसह उपस्थिती अपेक्षित आहे.

स्थळ-

तारीख-

वेळ-

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 4 (Photo Credit _ File Image)

जय मां अंबे

यंदा नवरात्री उत्सवामध्ये आमच्या येथे दिनांक .... दिवशी माताचं जागरण आयोजित केले आहे. त्यामध्ये ऑनलाईन सहभागी होण्यासाठी आम्ही ही लिंक शेअर करत आहोत. तरी यंदा त्याचा व्हर्च्युअली आनंद घ्यावा, ही विनंती.

आपले नम्र,

लिंक-

वेळ-

Navratri 2024 Invitation Card Format in Marathi 5 (Photo Credit _ File Image)

शारदीय नवरात्रीमध्ये चतुर्थी तिथी 6 आणि 7 ऑक्टोबर असे दोन दिवस असेल. अष्टमी आणि महानवमीचे व्रत शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी पाळण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा सण साजरा होणार आहे.