जगभरात 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers’ Day 2021) साजरा केला जातो. काही लोक याला जागतिक कामगार दिन (International Workers’ Day) असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील कामगार, कामगार चळवळ, कामगारांचे हक्क यांबाबत चर्चा घडते. जगभरातील कामगार संघटना आणि कामगार वर्गावर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भांडवलदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या चर्चांतून काय निष्पन्न होते याचे गणित फारसे कोणी मांडत नाही. खरे तर ते मांडायला हवे. कामगारांच्या अधिकार, हक्क, फसवणूक, पिळवणूक आणि भवितव्य यांवर जागभर चळवळ उभी राहायला हवी. पण असे अपवादानेच घडताना दिसते. दरम्यान, या दिवशी शुभेच्छा मात्र एकमेकांना नक्कीच दिल्या जातात. जागतिक कामगार दिनानिमित्त आपणही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी Messages, Wallpapers, WhatsApp Status इथे देत आहोत. आंतरराष्ट्रीय कामगार दिन शुभेच्छा एचडी इमेज (International Workers’ Day HD Images) आपण इथे डाऊनलोड करु शकता.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात 1 मे 1886 पासून झाली. जेव्हा अमेरिकेत कामगार संघटनांनी कामगारांच्या कामाचे तास 8 पेक्षा अधिक न ठेवण्याबाबत आंदोलन केले.
सन 1877 मध्ये कामगारांनी काम करण्याचे तास ठरवण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर मे 1886 मध्ये संपूर्ण अमेरिकेत हजारो कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. सुमारे 11 हजार कारखान्यांतील 3 लाख 80 हजार कामगार सहभागी झाले होते. (हेही वाचा, Happy Labour Day 2021 Wishes: जागतिक कामगार दिनानिमित्त खास मराठी Messages, Images, WhatsApp, Facebook Status द्वारे शुभेच्छा देऊन व्यक्त करा कामगारांबद्दलचा आदर)
भारतात एक मे हा कामगार दिवस म्हणून पहिल्यांदा चेन्नई 1 मे 1923 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या काळात हा दिवस मद्रास दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याची सुरुवात भारतीय कामगार शेतकरी पक्षाचे नेते कॉमरेड सिंगरावेलू चेट्यार यांनी केली.
भारतात मद्रास हायकोर्टासमोर एक मोठे आंदोलन केले आणि एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली. तसेच, या दिवशी सर्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली.