International Beer Day 2020: आंतरराष्ट्रीय बियर डे निमित्त अनेकांच्या Favourite Drink विषयी 'या' खास गोष्टी जाणुन घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Guy Kilty/Twitter)

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बियर डे (International Beer Day 2020) साजरा केला जातो. मुळात या दिवसाची सुरुवात 2007 मध्ये सांता क्रूझ, कॅलिफोर्निया मध्ये जेसी अवशालोमोव्ह यांच्याकडुन झाली होती. खरंंतर कोणत्याही पार्टीचा मूड सेट करण्यासाठी किंवा विकेंडची मज्जा लूटण्यासाठी इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असलेली बियर (Beer Facts)  तरुणाईची फेव्हरेट झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन 2007 मध्ये या दिवसाची सुरुवात करण्यात आली. या दिवसाची तीन मुळ उद्दिष्ट अशी की, या निमित्ताने मित्रांंना भेटण्याची संंधी मिळावी, बियर बनवणार्‍या कंंपनी आणि व्यक्तींंना सेलिब्रेट करणे आणि एकुणच या जगभरात प्यायल्या जाणार्‍या पेयाच्या माध्यमातुन जगाला एकत्र आणणे. आज सुद्धा या दिवसाच्या निमित्ताने आपण या अनेकांंच्या फेव्हरेट पेयाविषयी काही खास गोष्टी जाणुन घेणार आहोत.

International Beer Day 2020 Facts:

-बियर नेहमी ब्राउन रंंगाच्या बॉटल मध्ये सर्व्ह करण्यामागे मुख्य कारण असे की, जर का बियर थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आली तर त्यात Sulphorus गॅस तयार होऊ शकतो, हे टाळण्यासाठी अनेक (सर्वच) कंंपनी बियर गडद आणि विशेषतः ब्राउन रंंगाच्या बॉटल मध्ये सर्व्ह करतात.

-कोणत्याही शास्त्राप्रमाणेच बियरचा अभ्यास करणे ही सुद्धा एक शैक्षणिक शाखा आहे, याला Zythology असं नाव असुन यात बियरच्या घटकांचे विश्लेषण आणि मद्यनिर्मिती प्रक्रियेवर त्यांच्यावरील परिणाम, बियरच्या शैली आणि इतिहास यांंचा अभ्यास केला जातो.

-बियर मधील कडवे लागणारे हॉप्स हे कॅनाबॅसीच्या वर्गातील आहेत ज्यामुळे त्यांचे परिणाम हे (Marijuana) गांजाच्या प्रमाणे होउ शकतात.

- बियर तयार करणार्‍या Brewers मध्ये सर्वात आधी महिलांंना संधी दिली जात होती, किंबहुना जगातील प्रथम बियर निर्मात्या या महिला होत्या. यासाठी त्या उच्चवर्णीय किंवा अत्यंत सुंदर असणे इतकेच निकष पाहिले जायचे.

- आइस-कोल्ड बिअर हा बीयर सर्व्ह करण्याचा उत्तम मार्ग नाही. बियर मधील थंडपणा जीभेच्या संंदेवना जाग्या करतो मात्र जर का आपण आपल्या बिअरला जास्त थंड कराल, तेव्हा या संंवेदना पुर्णपणे बंद होतात आणि कोणतीच चव घेता येत नाही.

- बिअरची सर्वात जुनी ज्ञात रेसिपी सुमेरियन लोकांनी बनवलेल्या 4,000 वर्ष जुनी आहे.

- सुमेरियन, बॅबिलोनी आणि इजिप्शियन लोक मद्यपान करण्यास प्रचलित होते, याकाळी स्ट्रॉ चा वापर करुन बियर प्यायली जात होती, आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे सोन्या- चांदीचा स्ट्रॉ वापरला जात होता.

-बियरचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (योग्य प्रमाणात सेवन केल्यास)

दरम्यान, या दिवशी अनेक ठिकाणी बियर फेस्टचे आयोजन केले जाते, ज्यात अन्य कोणत्याही सणाप्रमाणे आपल्या जवळच्या मंंडळींना गिफ्ट सुद्धा केले जातात. केवळ बियर पिणेच नव्हे तर बारटेंडर आणि इतर बिअर तंत्रज्ञांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले जाते.