देशात दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी ‘भारतीय वायूसेना दिवस’ (Indian Air Force Day 2021) साजरा केला जातो. आज भारतीय हवाई दल आपला 89 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी 1932 मध्ये हवाई दलाची स्थापना झाली होती. अनेकांना हे माहित नसेल की स्वातंत्र्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्स म्हटले जात असे. 1 एप्रिल 1933 रोजी हवाई दलाचे पहिले पथक तयार करण्यात आले. यात 6 आरएएफ प्रशिक्षित अधिकारी आणि 19 एअर कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्धात भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्यानंतर त्यातून 'रॉयल' हा शब्द काढून टाकण्यात आला.
स्वातंत्र्यापूर्वी हवाई दलाचे नियंत्रण लष्कराकडून होत असे. लष्करापासून हवाई दलाला 'मुक्त' करण्याचे श्रेय भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ, एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना जाते. ते हवाई दलाचे पहिले प्रमुख, भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल होते. ते 15 ऑगस्ट 1947 ते 22 फेब्रुवारी 1950 या पदावर होते. आज भारतीय हवाई दलाची कामगिरी पाहता प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. तर वायूसेनेच्या स्थापना दिवसानिमित्त तुम्ही Wishes, Quotes, HD Images, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे हवाई दल आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी गाझियाबाद येथे हिंडन एअर बेसवर वायुसेना आपला स्थापना दिवस साजरा करतो. यंदाचा 89 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यावेळी हा दिवस साजरा करताना कोरोना महामारी दरम्यान कोविड-19 प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जाईल.