
Independence Day Wishes in Marathi: भारतभूमीला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला, स्वतंत्र झालेला दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला; त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणांच्या आहुती देणा-या, भारतभूमिच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना, जवानांना च्या बलिदानाचा मानाचा मुजरा करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. अशा या महान दिनी आपल्या आप्तलगांना शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वातंत्र्याची आग मनात कायम धगधगती ठेवण्यासाठी खास मेसेजेस.




15 ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते