Independence Day 2020 Marathi Messages: भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून यावी असा हा दिवस. या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहन केले जाते. आज भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने या दिवसाची आठवण आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा स्वातंत्र्या दिन साजरा करतो. तुमच्या मित्र-मैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील मराठी Wishes, Greetings, Images, WhatsApp Status नक्की उपयोगात येतील.
कोरोना व्हायरसमुळे आणि लॉकडाऊन मुळे आज अनेकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी मेसेजेसच्या माध्यमातून लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी मेसेजेस:
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी माझा भारत देश घडविला,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहेत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
निशाण फडकत राही,
निशाण झळकत राही,
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
हिंद देशातील निवासी सर्वजण एक आहेत,
रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
अशा या भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे,
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
दरम्यान, 15 ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संदेश देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात आणि नंतर प्रमुख पाहुण्यासहित कार्यक्रमाला जातात. याशिवाय या दिवशी शाळा व कॉलेजामध्ये नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. यंदा देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे. त्यामुळे यंदा सर्वांनी घरात राहून स्वातंत्र्य दिन साजरा करावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.