73 rd Independence Day Marathi Messages & Wishes: भारत देश 15 ऑगस्ट 2019 दिवशी 73 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करणार जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आपल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होईल. ब्रिटीशांच्या गुलामगिरीमधून भारताची सुटका झाल्यानंतर हा स्वातंत्र्याचा सोहळा साजरा केला जातो. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन (Indian Independence Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्य दिनाचं 73 वं वर्ष असल्याने हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग या स्वतंत्र भारताची 73 वर्ष डिजिटल मीडीयामध्ये व्हॉट्सअॅप, फेस बुकच्या माध्यमातून खास मराठमोळे Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, SMS, WhatsApp and Facebook Status च्या माध्यमातून देण्यासाठी नक्की शेअर करा. 73rd Indian Independence Day 2019: स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घ्या भारताविषयी 5 अचंबित करणा-या गोष्टी
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामानाथ कोविंद देशाला संबोधित करता तर उद्या (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाचा सोहळा दिल्ली येथील लाल किल्ल्यावर रंगणार आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांसोबतच मंत्री आणि देशा-परदेशातील मान्यवर मंडळी या सोहळ्याला उपस्थिती लावतात.
73 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी माझा भारत देश घडविला,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहेत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी GIFs
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छासंदेश व्हिडिओ
यंदा जम्मू कश्मीरमधील कलम 370 आणि 35 A रद्द केल्यानंतर हे दोन्ही प्रदेश आता केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित होणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणांच्या आहुती देणा-या, भारतभूमिच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना, जवानांना च्या बलिदानाचा मानाचा मुजरा !