तुमच्या साथीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हांला रोजच संधी असते पण खास पतीवर आपलं प्रेम व्यक्त करण्याचा एक खास असतो तो तुम्हांला ठाऊक आहे का? एप्रिल महिन्यातील तिसरा शनिवार हा Husband Appreciation Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस National Husband Day किंवा World Husband Day म्हणून देखील ओळखला जातो. यंदा हा दिवस 20 एप्रिल दिवशी आहे. मग आजच्या दिवशी तुमच्या पतीवरील प्रेम व्यक्त करत त्याला शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा तुम्ही शुभेच्छा दएत हा दिवस खास करू शकाल. त्यासाठी खालील फोटोज डाऊनलोड करून सोशल मीडीयात तुम्ही शेअर करू शकाल.
Husband Appreciation Day हा दिवस पती बद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा आहे. अनेकदा त्याच्या कडून अपल्याला मिळालेल्या अनेक लहान सहान गोष्टींबद्दल आपल्याकडून विसर पडतो. त्याला या दिवसाचं औचित्य साधत एकदा थॅक्स म्हणा. त्याने कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची या दिवसानिमित्त जाणीव ठेवत तुमच्या व्यस्त दिवसामधून थोडा वेळ काढा आणि त्याचा आजचा दिवस खास करा.
Husband Appreciation Day च्या शुभेच्छा
कुटुंब जसं मोठं होत जातं तसं तुम्हांला तुमच्या साथीदारासोबत वेळ घालवणं कमी होत जातं. मग या दिवसाचं औचित्य साधत पुन्हा तुमचं नातं मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. आजच्या दिवसाचं तुम्ही रोमॅन्टिक सेलिब्रेशन देखील करू शकता. या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकमेकांसोबत खास आठवणी बनवू शकता.