
Women's Day 2024 HD Images: दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day 2024) साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील महिलांना समर्पित आहे. महिला या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक स्त्रीची भूमिका कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या निर्मिती आणि विकासात महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. परंतु, आजही अशा अनेक महिला आहेत ज्यांना त्यांच्या हक्कांची माहिती नाही. अनेक क्षेत्रात, नोकरदार महिला आणि मजुरांना समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते.
समान संधी, सन्मान आणि अधिकार न मिळाल्यामुळे महिलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि सक्षम महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आयुष्यातील आई, पत्नी, महिला मित्र आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील Quotes, Greetings, Messages मोफत डाऊनलोड करू शकता. (International Women’s Day 2024: 5 बॉलीवूड चित्रपट ज्यात स्त्रिया मुख्य भूमिकेत, जाणून घ्या अधिक माहिती)
महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा!

तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कतृत्व,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक नारीला, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला,
तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला सलाम
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हा दिवस विशेषतः महिला आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांना समर्पित आहे. दरवर्षी हा विशेष दिवस एका थीमसह साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 ची थीम 'इन्स्पायर इनक्लूजन' अशी आहे. या वर्षीच्या मोहिमेची थीम लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी समावेशाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.