Hartalika Teej 2020: भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस कुमारिकांनी आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून आणि सुवासिनींनी आपले अखंड सौभाग्य राहावे म्हणून करण्यात येणारे व्रत म्हणजे 'हरतालिका (Hartalika).' या शब्दातच 'हर' म्हणजेच भगवान शंकराचे अस्तित्व आहे. म्हणून या दिवशी कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया शंकराच्या पिंडीवर 16 पत्री अर्पण करतात. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, पार्वती मागच्या जन्मी कुमारिका असताना भगवान शंकरासाठी हे व्रत केले होते. ज्यामुळे तिला पुढच्या जन्मी पती म्हणून शंकर भगवान प्राप्त झाले. या दिवशी संपूर्ण एक दिवस उपवास केला जातो. त्यावेळी तिने पिंडीवर वाहिलेल्या 16 पत्री आजही वाहिल्या जातात. या 16 पत्री कोणत्या हे तुम्हाला माहिती आहे का?
अनेक कुमारिकांना आणि महिलांना हे व्रत कसे करावे हे माहित असेलही कदाचित. मात्र त्यात वाहण्यात येणा-या 16 पत्री कोणत्या आणि त्या प्रत्येक पत्रीचे महत्व काय हे जाणून घेण्याची अनेक जणींना उत्सुकता असेल. Hartalika Teej 2020 Special Mehndi Designs: हरितालिका तृतीयेनिमित्त या 5 ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स काढून करा शिव-पार्वती पूजन!
जाणून घ्या सविस्तर
1. बेलपत्र- शिवतत्व आणि शक्ती चे प्रतीक
2. आघाडा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
3. मालती- शिव आणि शक्ती चे प्रतीक
4. दुर्वा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
5. चंपक- महाकाली चे प्रतीक
6. करवीर- शक्ती चे प्रतीक
7. बदरी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
8. रुई- हनुमान आणि शक्ती चे प्रतीक
9. तुळस- विष्णु आणि शक्ती चे प्रतीक
10. मुनिपत्र- निर्गुण चे प्रतीक
11. दाडिमी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
12. धोतरा- शिव आणि शक्ती चे प्रतीक
13. जाई- शक्ती चे प्रतीक
14. मुरुबक- महाकाली चे प्रतीक
15. बकुळ- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
16. अशोक- ब्रह्म आणि शक्ती चे प्रतीक
या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.