Happy Yoga Day 2022 HD Images: आंतरराष्ट्रीय योग दिन HD Images, Wallpapers, Wishes शेअर करत द्या योगाप्रेमींना शुभेच्छा
International Yoga Day 2020 | File Image

जगभरात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ( International Yoga Day 2022) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी योगप्रसार आणि योगाशी संबंधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात केवळ योगालाच महत्त्व दिले जात नाही. तर, प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी आणि दैनंदिन जीवनाला उत्साही ठेवण्यासाठी योगा करणे किती महत्त्वाचे आहे यावरही लक्ष केंद्रीत केले जाते. अनेकांचा असा गैरसमज आहे की, योगा म्हणजे वृद्धापकाळात करण्याची गोष्ट आहे. पण तसे नाही. आजकाल सर्वांनाच योगाचे महत्त्व पटू लागले आहे. परिणामी लोक योगा दिनही उत्साहात साजरा करु लागले आहेत. अशा या खास दिवशी आपण आपल्या मित्रपरिवारला आणि नातेवाईकांनाही या दिवसाच्या शुभेच्छा Facebook,WhatsApp Status च्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी या काही Happy Yoga Day 2022 HD Images.

उद्या म्हणजेच 21 जून रोजी देशभरात योगा डे साजरा केला जाईल. आपणही या योगा डेमध्ये सहभागी होऊ शकता. 21 जून 2015 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योगा दिवस जाजरा करण्यात आला. 27 सप्टेंबर 2014 मध्ये भारतात पहिल्यांदा योगा दिवस साजरा करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रमध्ये 177 देशांनी 11 डिसेंबर 2014 ला मंजूरी दिली. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाऊ लागला.

प्रत्येक वर्षी 21 जून रोजी आंतराष्ट्रीय योगा डे साजरा केला जातो. हा दिवस हा संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा आणि लांब दिवस मानला जातो. या दिवशी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सर्वात अधिक पडतो. त्यामुळे या दिवसाला सर्वात मोठा दिवस म्हणले जाते. यात दिवशी योगा करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायूष्य लाभते असे मनले जाते.