Happy Women's Day 2022 Images: दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा संपूर्ण इतिहासात आणि जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी समर्पित दिवस आहे. आणि सामान्यत: सर्व भिन्न पार्श्वभूमी आणि संस्कृतीतील महिलांनी लैंगिक समानतेसाठी संघर्ष करण्यासाठी एकत्रितपणे एकत्र येण्याचा दिवस आणि स्त्रियांचे अधिकार. तर प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम मानाचा मुजरा!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी १६ हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या - चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने ८ मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. तर यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Messages, Wallpapers, WhatsApp Status, Facebook Post आणि ग्रिटिंग्स पाठवून द्या शुभेच्छा! (International Women Day 2022: फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रात 'या' 5 महिलांनी भारताचे नाव केलं उज्जवल; वाचा सविस्तर)
जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे सेलिब्रेशन होते. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.आताच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी पूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. महिलांना शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार नव्हता. स्वातंत्र्य नव्हते. मुलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या महिला वर्गाला आपले हक्क मिळवण्यासाठी लढावे लागले.