
वेलेंटाईन वीक (Valentine Week) मध्ये सुंदर गुलाब आणि गोड चॉकलेट दिल्यानंतर आता तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला टेडी गिफ्ट देण्याचा आजचा दिवस. या रोमॅन्टिक वीक मधला 10 फेब्रु वारी हा चौथा दिवस टेडी डे (Teddy Day) म्हणून साजरा केला जातो. टेडी बेअर तुमच्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट देत या आठवड्याची रंगत वाढवण्यासाठी प्रयत्न करा. टेडीचा गोंडसपणा तुमच्या नात्यामध्येही रहावा म्हणून तुमच्या पार्टनरला आजच्या दिवशी सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेजेस, Wishes, GIFs, Greetings च्या माध्यमातून टेडी डे च्या शुभेच्छा द्या आणि आजचा दिवस खास करा.
दरम्यान वेलेंटाईन वीक मध्ये पाचवा दिवस हा प्रॉमिस डे, सहावा दिवस हा हग डे , सातवा दिवस हा किस डे आणि आठवा दिवस हा वेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाईल. हे देखील नक्की वाचा: Valentine Week and Anti-Valentine 2022 Week Full List: व्हॅलेंटाईन डे पासून ब्रेक-अप डे पर्यंत 'या' महत्त्वाच्या तारखांची यादी ठेवा लक्षात!
टेडी डे 2022 शुभेच्छा
- तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा
Happy Teddy Day

- टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
Happy Teddy Day

- हॅप्पी टेडी डे

- टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा

- तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,वेले
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
Happy Teddy Day

सॉफ्ट टेडी बेअरला घट्ट मिठी मारून झोपल्याने शरीरात हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि यामुळे अनावश्यक घेतलेला ताण, टेंशन कमी होण्यास मदत होते. हे संशोधनातूनही समोर आलेले निरिक्षण आहे. मग तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यातही ताण हलका करण्यासाठी आजच्या दिवशी किमान मेसेज दवारा टेडी पाठवा आणि किमान त्याच्या दिवसाची सुरूवात चेहर्यावर एक सुंदर स्माईल आणून करा.