Happy Teachers Day 2020 Wishes: आई आपल्याला जगात आणते, वडिल आपल्याला जग दाखवतात आणि जी व्यक्ती आपल्याला जगात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ज्ञान देतो अशा शिक्षकास वंदन करण्याचा महान दिवस देशभरात शिक्षक दिन (Teacher's Day) म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यांची शिक्षणावर नितांत श्रद्धा होती आणि आदर्श शिक्षक सर्व गुण त्यांच्यात होते. म्हणून या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. यंदा कोरोना व्हायरसमुळे जे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून या दिनाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही त्यांनी हे शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या शिक्षकांना अमूल्य भेट द्यावी.
त्यासाठी प्रत्येक जण व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मिडिया माध्यमांची मदत घ्याल. मात्र त्यासाठी तितकेच चांगले आणि सुंदर अशा शुभेच्छा संदेशांच्या जर तुम्ही शोधात असाल तर येथे तुम्हाला मराठीतून छान शुभेच्छा संदेश मिळतील.
गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण जगी न होई सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदूया गुरुराया
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शि- शीलवान
क्ष- क्षमाशील
क-कर्तव्यनिष्ठ
हे सर्व गुण असलेल्या महान गुरूवर्यांस
शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा
अपूर्णाला पूर्ण करणारा
शब्दांनी ज्ञान वाढविणारा
जगण्यातून जीवन घडविणारा
तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या
ज्ञानरुपी गुरुंना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
साक्षर आम्हास बनवले
जीवन काय आहे ते समजावले
बरोबर-चूक ओळखायला शिकवले
असे महान गुरु आम्हास लाभले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे त्यांच्या अमूल्य त्यागाबाबत त्यांचे आभार मानण्याचा याहून चांगला दिवस आणखी कोणता असूच शकत नाही. गुरु-शिष्याचे नाते असेच कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आपल्या गुरुवर्यांना अमूल्य भेट द्या.