Happy Shani Jayanti 2021 Messages: भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात अनेक रुढी, परंपरा, देवधर्म आणि कर्मकांडं आढळतात. या पैकीच एक म्हणजे शनि देव. असे मानले जाते की शनि देवाची पूजा केल्याने लोकांना पापमुक्ती मिळते. कोणी म्हणतात लोकांच्या मागे असलेल्या आडीअडचणी निघून जातात. यश मिळते. आयुष्यात बरकत येते. काही लोकांचे म्हणने असे की, पाठीमागे असलेली साडेसाती निघून जाते. वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जातात. असो, शनि जयंती यंदा 10 जून रोजी साजरी केली जाणार आहे. शनि जयंतीनिमित्त आपण जर शनिप्रती असलेली आपली भावना व्यक्त करणार असाल तर, त्यासाठी इथे HD Images, Wallpapers, Messages, Images, Greetings देत आहोत.
ज्योतिष विद्येचे अभ्यासक सांगतात की, सर्वसामान्यपणे अनेक लोकांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटं येत असतात. अनेक समस्या असतात. या समस्यांचा सामना करण्यासाठी, संकटसमस्या निवारणासाठी हे लोक मार्ग शोधत असतात. अशा वेळी आपली पुराणं सांगतात की शनिदेवाची उपासना करावी. ज्यामुळे ही सर्व संकटे दूर होण्यास मदत होते. (हेही वाचा, Shani Jayanti 2021 Wishes: शनि जयंती निमित्त खास Images, Messages, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरे करा शनिदेवाचे खास पर्व)
शनि जयंती इमेज
शनि जयंती इमेज
सांगितले जाते की शनि जयंती ही शनिदेवाच्या जन्मदिनी साजरी केली जाते. शनिदेवास सूर्यदेव आणि छायाचे अपत्य मानले जाते. शनिदेवाचा रंग काळा आहे. तसेच त्याचे वाहनही आहे. मकर आणि कुंभ राशीचा हा देव अत्यंत हळवार प्रवास करत असतो. त्यामुळे असे मानले जाते की, ज्याच्यावर शनिची वकृदृष्टी पडते त्याला अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, अशा व्यक्तिंची प्रगती होण्यास प्रचंड वेळ लागत असतो. शनिची महादशा 19 वर्षांपर्यंत राहू शकते. परंतू, जर एखाद्यावर शनिची शुभ दृष्टी पडल्यास त्याचे आयुष्य राजासारखे बनते असे सांगतात. त्यामुळे शनिदेवास मानणारे लोक शनिला खूश करण्याचा प्रयत्न करतात.
शनि जयंती इमेज
शनि जयंती इमेज
शनि जयंती इमेज
शनि देवाचे नाव उच्चाराच अनेक लोक काहीसे घाबरतात. त्यांना असे वाटते की, शनिची वकृदृष्टी आपल्यावर पडल्यास आपल्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण शनिच्या नजरेपासून दूर राहावे किंवा त्याची चांगली दृष्टी आपल्यावर पडावी यासाठी या लोकांचे विशेष प्रयत्न असतात. त्यासाठी अनेक उपवास, प्रदक्षणा, शनिदर्शन आणि शनिला तेल वाहणे यांसारखे प्रयोग केले जाता.
(टीप- वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. तसेच, केवळ माहितीच्या हेतूने देण्यात आली आहे. लेटेस्ट मराठी वरील माहितीची पुष्टी, समर्थन करत नाही. तसेच, जबाबदारी स्वीकारत नाही. वाचकांनी स्वत:ची जबाबदारी आणि सत्याच्या कसोटीवर ही माहिती तपासून घ्यावी.)