Shani Jayanti 2021 Wishes: शनि जयंतीचा (Shani Jayanti 2021) पवित्र सण ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या अमावस्या दिवशी साजरा केला जातो. हा हिंदू धर्मातील एक खास सण आहे. शनिदेव न्यायाची देवता मानली जाते, व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव त्याला तसे फळ देतात. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी जर शनिदेवाची विधिवत पूजा-अर्चना केली तर भाविकांचे दु: ख दूर होते. यंदा 10 जून रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे. शनि निसर्गात संतुलन निर्माण करण्याचे कार्य करतो. अयोग्य आणि चुकीचे आचार-विचार बाळगणाऱ्या लोकांना शनिदेव दंड करतो. शनिच्या साडेसातीचा काळ हा एखाद्याला मोठी शिकवण देऊन जातो.
धर्मग्रंथानुसार, शनिदेवाचा जन्म सूर्याची पत्नी छाया हिच्या गर्भातून झाला. जेव्हा शनिदेव छायाच्या गर्भात होते, तेव्हा छाया भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये इतकी मग्न होती की, तिला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. त्याचा परिणाम तिच्या मुलावर झाला व त्यामुळे शनिदेवाचा रंग सावळा आहे. शंकराच्या वरदानामुळे नवग्रहात शनिचे स्थान सर्वोच्च आहे. तर या खास पर्वानिमित्त Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून द्या शनिजयंतीच्या शुभेच्छा.
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी |
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
हे शनि तुम हो सबसे बेमिसाल,
तुमसे आंख मिलाए किसकी है मजाल,
सूर्य के हो पुत्र तुम और छाया के लाल,
मूरत तेरी देखकर भाग जाए काल.
शनैश्चर जयंतीच्या शुभेच्छा!
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो
- शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
दरम्यान, अमावस्या तिथी 9 जून रोजी रात्री 01.57 ते 10 जून दुपारी 04.22 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून काळे उडीद व तेलाचा दिवा लावून शनिदेवाची आराधना करा. शनि जयंतीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना भोजन दिल्याने आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्य प्राप्त होते. शनिदेवाच्या पूजेवेळी ‘ऊं नीलांजनसमाभामसं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्त्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम’, या मंत्राचा जप करावा.