Shani Jayanti 2020 Marathi Wishes and Messages: शनीच्या शीघ्रकोपी प्रवृत्तीमुळे सारी दुनिया त्याला घाबरून असते. पण वास्तवामध्ये शनीच आहे जो मनुष्याला कर्मफळ देणारा न्यायपूर्ण देव आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची जयंती (Shani Jayanti) साजारी केली जाते. यंदा हा दिवस आज (22 मे ) दिवशी आहे. नवग्रहांपैकी शनी हा एकमेव ग्रह आहे ज्याची लोकं जयंती साजरी करतात. शनी देव (Lord Shani) प्रसन्न रहावा यासाठी शनी जयंतीला पूजा देखील केली जाते. यंदा तुम्ही शनी जयंती दिवशी बाहेर जाऊन मंदिरात दर्शन घेऊ शकत नसाल तर किमान शनी जयंतीच्या शुभेच्छा (Shani Jayanti Wishes) तुमच्या मित्र परिवारासह, कुटुंबातील नातेवाईकांना देऊन त्याला प्रसन्न नक्कीच करू शकता. मग आजच्या शनी जयंतीच्या दिवशी मराठमोळे मेसेजेस, SMS,शुभेच्छापत्र यांच्या माध्यमातून शनी जयंतीच्या शुभेच्छा देऊन आजचा दिवस मंगलमय करण्याचा नक्की प्रयत्न करा. Shani Jayanti 2020: शनि जयंती तारीख, आमावस्या, तिथी वेळ यांसह जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व.
शनी देव हा सूर्यदेवाचा पुत्र असल्याची आख्यायिका आहे. तर हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, तो सर्वात कोपिष्ट देव आहे. शनी जयंतीच्या निमित्ताने भाविक त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात. शुभार्शिवाद आणि कृपादृष्टी कायम राहावी म्हणून उपवास देखील केले जातात. राशीचक्राचा अभ्यास करणार्यांच्या मते, साडे साती असणार्यांनी शनी जयंती दिवशी उपवास करणं हितकारी आहे.
शनि जयंतीच्या शुभेच्छा
शनी जयंती दिवशी काही जण उपवास करतात तर महिला प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये नवर्याच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचं व्रत करतात. शनि देव आज तुमच्या सार्या इच्छा पूर्न करो हीच आमची प्रार्थना!