
National Selfie Day 2021 Images: सेल्फी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. प्रत्येक खास प्रसंगी सेल्फीला मोठा मान असतो किंवा प्रत्येक प्रसंग, गोष्ट सेल्फीमुळे खास होते, असे म्हणायला हरकत नाही. आमचा फोटो काढ, अशी दुसऱ्याला करण्याची विनंती सेल्फीने अगदीच विरुन गेली. आपल्या हाती असलेला फोन आपल्याला चक्क स्वत:चे फोटोज स्वत: काढण्याचा आनंद देऊन गेला. या सेल्फीसाठी एक खास दिवसही समर्पित करण्यात आला. तो 21 जून. या दिवशी नॅशनल सेल्फी डे साजरा केला जातो.
या सेल्फी डे निमित्त आपल्या सेल्फीप्रेमी मित्रमैत्रिणींना, भावंडांना, सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Images, Wallpapers. तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर सेल्फी प्रेमींना हॅप्पी सेल्फी डे म्हणू शकता. (Happy Selfie Day 2021 Messages: सेल्फी डे निमित्त Wishes, Quotes, Facebook आणि WhatsApp Status द्वारे शेअर करुन साजरा करा हा खास दिवस!)
सेल्फी डे शुभेच्छा!





फार पूर्वीपासूनच लोकांना आपले स्वत:चे चित्र पाहण्यास आनंद वाटतो. एखाद्या चित्रामध्ये आपण स्वत: कसे दिसत आहोत, याची लोकांना उत्सुकता असते. यासाठीच 1885 मध्ये सर्वात पहिल्या कॅमेऱ्याचा शोध लागला होता. परंतु, तेव्हा तुम्ही स्वत:चा फोटो काढू शकत नव्हतात. परंतु, आजकालच्या स्मार्ट जमान्यामध्ये तुम्ही स्वत:चा फोटो पाहिजे त्या अँगलमध्ये आणि पाहिजे तितके वेळा सहज काढू शकता.
2005 मध्ये कॅमेरा फोन, डिजिटल कॅमेरा आणि सोशल मीडिया यांचा वापर वाढल्यानंतर सेल्फी फोटोजनी फोटोग्राफीच्या दुनियेला एक वेगळेच वळण दिले. सर्वात पहिला सेल्फी काढणारा व्यक्ती हा अमेरिकेतील एक केमिस्ट असून त्याचे नाव Robert Cornelius असे आहे. त्याला 10-15 मिनिट एका ठिकाणी बसून त्याने पहिलावहिला सेल्फ पोर्ट्रेट 1839 मध्ये काढला होता.