
फेब्रुवारी महिना प्रेमी युगूलांसाठी खास असतो. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस साजरा करण्यापूर्वी तरूणाई आठवडाभर आधी व्हेलेंटाईन वीक साजरा करते. खरंतर या सात दिवसांच्या सेलिब्रेशन मागे ठोस कारण नाही पण मार्केटिंग गिमिक मुळे हे लव्ही डव्ही सेलिब्रेशन आता सर्रास सगळीकडे दिसते. या व्हेलेंटाईन वीक मध्ये सगळ्यात पहिला दिवस म्हणजे रोझ डे. आज तुमच्या साथीदाराला या रोज डे च्या शुभेच्छा खास अंदाजात देण्याची तुमची इच्छा असेल तर खालील मराठमोळी ग्रीटिंग्स तुम्ही नक्कीच तिला/ त्याला सोशल मीडीया मध्ये WhatsApp Messages, Status, Facebook Messages, Wishes, Images द्वारा देत हा दिवस खास करू शकता.
प्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात रोमॅन्टिक अंदाजच गुलाब आहे. गुलाबाच्या फुलाचा मोहक अंदाज, मंद सुगंध आणि मनाला प्रसन्न करणारे रंग समोरच्या मनातील भावना शब्दांद्वारा व्यक्त न होतादेखील खूप काही बोलून जातो. रोझ डे च्या निमित्ताने तुमच्या नात्यातील संबंधांनुसार गुलाबाचे रंग ठरतात. प्रत्येक गुलाबाचं नात्याची एक वेगळं समिकरण आहे. Valentine Week 2024 Date Sheet: व्हॅलेंटाईन वीक पूर्वी Rose ते Kiss Day; प्रेम साजरं करण्यासाठी 7 दिवसाचं सेलिब्रेशन पहा कोणत्या दिवशी?
हॅप्पी रोझ डे 2024 शुभेच्छा





रोझ डे थोडा अजून स्पेशल करायचा असेल तर थेट गुलाब न देता तुम्ही त्यापासून बनवलेले खास पदार्थ, केक्स किंवा भेटवस्तूंमध्ये परफ्युम, बुके देऊ शकता. पण प्रत्यक्ष नाजूक गुलाब देण्याची मज्जा इतर कोणत्याही वस्तूमध्ये नाही त्यामुळे तुमच्या व्हेलेंटाईनला इम्प्रेस करण्यासाठी आवडीनुसार खास गोष्ट निवडा.