Happy Rose Day Wishes In Marathi: रोज डे च्या शुभेच्छा WhatsApp  Status, Facebook Messages द्वारा देत Valentine's Week  ची करा रोमॅन्टिक सुरूवात!
Rose Day Marathi Wishes | File Images

Happy Rose Day 2021 Marathi Wishes and Messages:  प्रेमवीरांसाठी फेब्रुवारी हा महिना विशेष असतो. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान रोझ डे (Rose Day) ते व्हेलेंटाईन डे असे 7 खास दिवस सेलिब्रेट करण्याची प्रथा आहे. प्रेम आणि गुलाब हे समीकरणच गोड असल्याने अनेकजण या लव्ही डव्ही वीकची सुरूवात गुलाब देऊन करतात. यंदा तुम्ही देखील तुमच्या खास व्यक्तीला रोझ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी काही हटके पर्यायांचा विचार करत असाल तर तुमच्या दिवसाची सुरूवात सोशल मीडियामध्ये हॅप्पी रोझ डे 2021 (Happy Rose Day Wishes)  च्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (WhatsApp Messages), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), व्हॉट्सअ‍ॅप स्टीकर्सच्या (WhatsApp Stickers) यांच्यामाध्यमातून देऊन करू शकता. टीम लेटेस्टली कडून तुमच्या आयुष्यातील त्या स्पेशल व्यक्तीला रोझ डे (Rose Day) च्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स, मराठी संदेश, शायरी, HD Images घेऊन आलो आहोत. त्या तुम्ही डाऊनलोड करून नक्की शेअर करू शकता.

प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा जरी वापर केला जात असेल तरीही गुलाबाच्या रंगावरून भावना बदलत असतात. लाल हा प्रेमाचा रंग असल्याने अनेकजण लाल गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात तर इतर भावनांसाठी तुम्ही पिवळ्या, पांढर्‍या, गुलाबी छटांचा वापर करू शकता. गुलाब जर तुमच्या कडे नसेल किंवा रोझ डे यंदा थोड्या वेगळ्या अंदाजामध्ये सेलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही या काही रोझ डे स्पेशल गिफ्ट्सचा विचार करू शकता.

रोज डे 2021 मराठी शुभेच्छा

 

Rose Day 2021| File Photo

  • माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीला

    रोज डे च्या हार्दिक शुभेच्छा

    हॅपी  रोज डे

Happy Ros Day 2021| File Photo

  • भेटत नाहीस रोज रोज

    पण आठवणीत असतेच दररोज

    पाठवत आहे रेड रोज

    जो तुला माझी आठवण करून देईल

    दररोज

    Happy Rose Day

Rose Day Wishes | File Photo

  • हॅप्पी रोज डे!

Rose Day Marathi Wishes | File Images

  • रोज डे च्या खास शुभेच्छा!

Rose Day | File Photo

  • एक गुलाब त्यांना जे भेटत नाहीत रोज रोज

    पण आठवणीत असतात दररोज

    हॅपी रोज डे

आजकाल वॉट्सअ‍ॅप वर थेट स्टिकर्सच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या अंदाजामध्ये रोज डे च्या शुभेच्छा देऊ शकता. याकरिता तुम्हांला गूगल प्ले स्टोअर वर ROSE DAY या नावाने स्टिकर पॅक डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही थेट ती पाठवू शकता.

valentine week ची सुरूवात रोज डे पासून केली जाते. दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून त्याला सुरूवात होते. त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि सर्वात शेवटी सगळ्य्यात स्पेशल व्हेलेंटाईन डे साजरा केला जातो. या प्रत्येक दिवसाला खास करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात. विशेष प्लॅन्स बनवले जातात. दरम्यान भारतामध्ये व्हेलेंटाईन डे सेलिब्रेट करण्याबाबत मतमतांतर आहेत.