Rose Day 2020 Wishes: रोज डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन व्यक्त करा तुमचे प्रेम
आपल्या प्रिय व्यक्तीला रोज डे च्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांना थोड्या हटके आणि भन्नाट शुभेच्छा संदेशाची गरज असेल. पण अनेकांना ते सुचत नसेल. अशा लोकांसाठी मराठमोळ्या Rose Day च्या शुभेच्छा
Rose Day 2020 Marathi Wishes: गुलाबी थंडीत तुमचे तुमच्या जोडीदारावर असलेले गुलाबी प्रेम आणखी बहरण्यासाठी तमाम प्रेमीयुगुलांचा आवडीचा व्हॅलेनटाईन सप्ताहासाठी एव्हाना जोरदार तयारी सुरु झाली असेल. तुमचे तुमच्या आवडत्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस असतो. या दिवसाच्या 7 दिवस आधी सुरु होतो व्हॅलेंटाईन सप्ताह ज्याची सुरुवात होते Rose Day पासून. या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन आपल्या त्याच्यावर किती प्रेम आहे ते व्यक्त करतात. या गुलाबाच्या फूलांसह प्रत्येकाला गरज असते ती शुभेच्छांची.
आपल्या प्रिय व्यक्तीला रोज डे च्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांना थोड्या हटके आणि भन्नाट शुभेच्छा संदेशाची गरज असेल. पण अनेकांना ते सुचत नसेल. अशा लोकांसाठी मराठमोळ्या Rose Day च्या शुभेच्छा
जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल पाहीन
तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येईल
Happy Rose Day

रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
Happy Rose Day
आज पाठवत आहे
तुला मी Rose,
कारण मला तुझी आठवण येते दररोज
Happy Rose Day

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day

GIFs Images:
प्रेम केवळ मनात असून उपयोग नाही ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडे व्यक्त कारणंही तितकंच गरजेचं आहे. मग यंदा गुलाबाच्या माध्यमातून ते या मेसेजेसच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करून पहा. त्यासाठी तुम्हाला लेटेस्टली मराठीकडून खूप खूप सदिच्छा
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2020 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

