Happy Republic Day HD Images 2023: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेशासाठी HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message ; साजरा करो राष्ट्रीय उत्सव
Happy Republic Day | File Image

भारत यंदाच्या 26 जानेवारी रोजी आपला 74 वा प्रजासत्ताक दिन (74th Republic Day of India) साजरा करत आहे. पाठिमागच्या 74 वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी आणि प्रगती केली. प्रामुख्याने विज्ञान, अवकाश, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण, सामाजिक समता आणि न्याय यांसह विविध क्षेत्रांमध्ये आपण अव्वल कामगिरी केली. देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा असला तरी प्रजासत्ताक दिनी या सर्व प्रगतीसह जल्लोष केलाच पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दिवस. त्यामुळे या दिवशी भारतीय नागरिक एकमेकांना शुभेच्छा (74th Republic Day) देतात. आताचे युग तर डिजिटल यूग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा युगात वावरताना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Republic Day HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Messages इथे देत आहोत. ज्या आपण अगदी मोफत डाऊनलोड करु शकता आणि शेअरही करु शकता.

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

भारतभूवर तिरंगा फडकला

उत्सव नभात सजला

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडवला

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! (हेही वाचा, Republic Day 2023 Rangoli Ideas: प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन व्हिडीओ, खास तुमच्यासाठी, पाहा)

विविधतेत एकता.. सुजलाम.. सुफलाम..

समृद्ध आणि पवित्रता.. भारत देश महान..

प्राणांहूनही प्रिय आम्हा हिंदूस्तान

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

तिरंगा ओळख आमची

राज्यघटना स्वाभिमान..

भारताच्या प्रगतीचे..

लोकशाही हेच निशाण..

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

 

लोकशाही म्हणजे स्वातंत्र्याचा मंत्र

राज्यघटना म्हणजे जगण्याचा अधिकार

अखंड अबाधित ठेऊ संविधान

होऊन प्रगतीवरती स्वार

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे महत्त्वाचे कारण

प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार करून, भारताने स्वतःला एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले. परिणामी, दरवर्षी या दिवशी केंद्र सरकार आणि नागरिक प्रजासत्ताक दिन साजरा करतात. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली आणि काही महिन्यांनंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती लागू झाली.