
Happy Rang Panchami 2020 Images: रंगपंचमी ही होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच चैत्र कृष्ण पंचमीला साजरी केली जाते. धुलिवंदनप्रमाणेच या दिवशी देखील रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी लोकं एकमेकांना गुलाल लावतात. प्रामुख्याने कोळी बांधव आणि ग्रामीण भागामध्ये आजही पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होलिकादहना दिवशी होळी पेटवली जाते. पुढील चार दिवस धुळवड आणि पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा 13 मार्चला रंग पंचमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रंगांची उधळण करणारा हा सण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार आणि वैज्ञानिक कारणांनुसार होलिकादहन किंवा होळीचा सण हा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. त्यामुळे 5 दिवस होळीचा अग्नी पेटता ठेवून वातावरणातील विनाशी गोष्टी, शक्तींचा नाश केला जातो. त्यानंतर सुरू झालेल्या नव्या दिवसांचं रंगांची उधळण करून स्वागत केलं जातं. या दिवशी आपल्या लोक एकमेकांना रंग पंचमीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीही तुमच्या मित्र-मैत्रिणींना खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Shimga Festival 2020: शिमगोत्सव निमित्त कोकणात दशावतार, जाखाडी नृत्य ते ग्रामदैवतेची पालखी नाचवणं असा असतो होळी सणाचा उत्साह!)





महाराष्ट्रात रंगपंचमीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. शहरी भागांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी करण्याची प्रथा आहे. परंतु, असं असलं तरी उर्वरित महाराष्ट्रात रंगपंचमी जल्लोषात साजरी केली जाते. रंगपंचमी दिवशी प्रामुख्याने अबीर आणि गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली जाते. तुम्हीही रंगपंचमीच्या दिवशी रंगाची उधळण करणार असाल तर नैसर्गिक रंगाचा वापर करा. त्यामुळे पर्यावरणाला तसेच तुम्हाला कोणताही धोका पोहचणार नाही.