रक्षाबंधन (Photo Credits: File Photo)

Happy Raksha Bandhan 2020 Wishes: रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. उत्सवाच्या दिवसाच्या सकाळपासूनच याची उत्सुकता आणि लगबग सुरू होते. एकमेकांना भेटण्यास असमर्थ असलेले भाऊ-बहिणी फोनच्या सहाय्याने या शुभ दिवसाचे स्वागत करतात. रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) निमित्त बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याला मिष्टान्न खायला घालते आणि आरोग्य, दीर्घायुष्य व आनंदी आयुष्यासाठी प्राथर्ना करते. त्या बदल्यात भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वाचन देतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan) महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 03 ऑगस्ट, सोमवार रोजी साजरा केला जाईल. रक्षाबंधन हा सण बहिण आणि भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हा परस्पर प्रेम व आपुलकीचा सण आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसशी लढत आहे आणि त्यामुळे लोकांनी बाहेर जाऊन भेटणे सध्या सुरक्षित नाही. परंतु रक्षाबंधनाच्या या शुभ सणानिमित्त तुम्ही तुमच्या भावंडांना नक्कीच प्रेमळ संदेश पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. (Raksha Bandhan 2020: रक्षा बंंधन दिवशी राखी बांधण्याचा मुहुर्त आणि योग्य पद्धत जाणुन घ्या)

आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे हा संदेश आपल्या भावंडांना पाठवू शकता. WhatsApp Stickers, Facebook Messages, GIF Greetings, HD Images, Shayari आणि SMS द्वारे हे प्रेमळ हिंदी संदेश आपण आपल्या भावंडांना पाठवू शकता. रक्षाबंधनाचे हे खास संदेश पहा:

1- रेशम के धागों का है ये मजबूत बंधन, माथे पर चमके चावल-रोली और चंदन, प्यार से मिठाई खिलाए प्यारी बहना, देख इसे छलक उठी आंखें, भर आया मन. हैप्पी रक्षा बंधन

2- बचपन की यादों का चित्रहार है राखी, हर घर में खुशियों का उपहार है राखी, भाई-बहन का परस्पर विश्वास है राखी, भाई-बहन के अटूट रिश्ते की डोर है राखी.

3- बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता, वो चाहे दूर भी हो तो गम नहीं होता, अक्सर रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते है, पर बहन-भाई का प्यार कभी कम नहीं होता. 

4- रिश्ता हम भाई-बहन का, कभी मीठा कभी खट्टा, कभी रूठना कभी मनाना, कभी दोस्ती कभी झगड़ा, कभी रोना और कभी हंसना, ये रिश्ता है प्यार का, सबसे अलग सबसे अनोखा...

5- याद आता है अक्सर वो गुजरा हुआ जमाना, तेरी मीठी आवाज में भाई कहकर बुलाना, वो सुबह स्कूल के लिए तेरा मुझको जगाना, अब क्या करें बहना यही है जिंदगी का तराना.

भाऊ-बहिणींमधील अतूट बंधाबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके हा उत्सव साजरा केला जातो. भावंड या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधनाचा दिवस हा भाऊ-बहिणीमधील प्रेमाचे सर्वात सुंदर उदाहरण आहे. राखी कच्चे सूत किंवा रंगीत कलावे, रेशीम धागा किंवा सोने किंवा चांदीच्या ब्रेसलेट अशा अनेक प्रकारची असू शकते. रक्षाबंधन हा सण तुमच्यासाठी शुभ जावो. हैप्पी रक्षाबंधन!