2022 या सरत्या वर्षाला निरिप देऊन आता 2023 मध्ये आपण पदार्पण करत आहोत. मागील 2-3 वर्ष जगभरातील लोकांसाठी कोरोना संकटामुळे एका दहशतीखाली गेलं आहे. पण आता हळूहळू पुन्हा अनेकांनी जीवनाची घडी बसवली आहे. नव्या उमेदीने नवी सुरूवात करणार्यांना आगामी वर्षाकडून पुन्हा आशा आहेत. मग हे नवं वर्ष तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाच्या, सुखाच्या, समृद्धीच्या गोष्टी घेऊन येवोत या कामनेसह तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना नववर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year 2023 Wishes) देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्र, Messages, Quotes, Greetings सोशल मीडीयात Facebook, WhatsApp, Instagram वर शेअर करत हा आनंद द्विगुणित करूया. नक्की वाचा: Happy New Year 2023 Wishes in Advance: नवीन वर्षानिमित्त WhatsApp Status, Messages, SMS शेअर करत आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!
ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार नव्या वर्षाची सुरूवात 1 जानेवारी दिवशी होते. जगभरात या विविध देशात विविध वेळेमध्ये नववर्षाची चाहुल लागते. मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र जमून, आतषबाजी करून हा क्षण साजरा करत असतात. यंदा 31 डिसेंबर-1 जानेवारी हे दिवस विकेंडला जोडून आले असल्याने सर्वत्रच मोठ्या प्रमाणात न्यू इयर सेलिब्रेशन होणार आहे. मग तुमच्यासाठी हे सेलिब्रेशन डिजिटल मीडीयात थोडं सोप्प करण्यासाठी ही लेटेस्टलीने बनवलेली ग्रीटिंग़्स डाऊनलोड करून तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
हॅप्पी न्यू इयर
2023 नवीन वर्षाच्या तुम्हांला
मनापासून हार्दिक शुभेच्छा!
नवीन रंग आहे,
नवीन रूप आहे,
मनामध्ये नवा जोश आहे,
नव्याच्या नवलाईत रंगूया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरून जा जुन्या गोष्टी,
नाराजीच रूपांतर प्रेमात होऊ दे,
नवीन वर्षात सुखांची बरसात होऊ दे
हॅप्पी न्यू इयर!
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात.
नववर्षाभिनंदन!
चला या नवीन वर्षांचं स्वागत करूया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी न्यू इयर अर्थात नववर्षाच्या शुभेच्छा म्हणत एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. 1 जानेवारी पासून सुरू होणारं वर्ष हे गॅगेरियन कॅलेंडरचं आहे. काही देशात त्यांच्या संस्कृती नुसार देखील नववर्षाची सुरूवात वेगवेगळ्या दिवशी केली जाते. भारतामध्येही हिंदू संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडवा दिवशी सुरू होते. तसेच पारसी, मुस्लिम बांधवंचं नववर्ष त्यांच्या कॅलेंडर नुसार वेगवेगळ्या महिन्यात, तारखेला सुरू होते.