
काही कटू-गोड आठवणी मागे सोडून 2021 हे वर्ष संपत आहे. हे संपूर्ण वर्ष कोरोना विषाणू आणि त्या अनुषंगाने आलेल्या समस्यांनी भरलेले होते. आता आशा आहे की येणारे नवे 2022 हे वर्ष (New Year 2022) तरी सुख शांती, समाधान आणि चांगले आरोग्य घेऊन येवो. तर, 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याची सुरुवात 15 ऑक्टोबर 1582 रोजी झाली. पूर्वी लोक 25 मार्चला तर कधी 25 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करायचे. रोमचा राजा नुमा पॉम्पिलस याने रोमन कॅलेंडर बदलले, त्यानंतर जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना मानला गेला.
तेव्हापासून जगभरात 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे केले जाते. न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया अशा अनेक देशांमध्ये नवीन वर्ष सुरूही झाले आहे व आता अवघ्या थोड्या वेळेत भारतामध्ये नवीन वर्षाची पहाट उजाडेल. भलेही कोरोना आणि निर्बंधांमुळे तुम्हाला बाहेर जाता आले नसेल, परंतु काही मराठी Facebook Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, GIFs, Images शेअर करून तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्रांना, शेजाऱ्यांना शुभेच्छा देऊ शकता व तुमच्या भावना व्यक्त करू शकता.





दरम्यान, नववर्षाबद्दल काही तथ्ये पाहायला गेले तर, असे मानले जाते की जगातील पहिले नवीन वर्ष सुमारे 4000 वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांनी (एक प्रजाती) साजरे केले होते. जानेवारी, ज्याला वर्षाचा पहिला महिना म्हटले जाते, त्याचे नाव जॅनस देवाच्या नावावरून ठेवले. रोमन कॅलेंडरनुसार, जॅनस देवाचे दोन चेहरे आहेत, एक पुढे आणि एक मागे. (हेही वाचा: Lucky Food for New Year 2022: या पदार्थांचे सेवन नवीन वर्षासाठी शुभ, वर्षभर नांदेल सुख-समृद्धी)
नवीन वर्षाच्या दिवशी, इटलीतील प्रत्येकजण लाल रंगाचे अंडरवेअर घालतो, जे ते संपूर्ण वर्षासाठी शुभ मानतात. यासह क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार, इतर कोणत्याही सुट्टीपेक्षा नवीन वर्षाच्या दिवशी अधिक वाहने चोरीला जातात. नवीन वर्ष आणि संकल्प यांचे फार जुने नाते आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जो सर्वाधिक संकल्प केला गेला तो होता, ‘फिट राहणे किंवा वजन कमी करणे’.