Happy National Ayurveda Day 2023 Wishes: धनत्रयोदशी दिवशी खास Images, Messages, Wishes, Greetings शेअर करून द्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा
Happy National Ayurveda Day 2023 Wishes (File Image)

Happy National Ayurveda Day 2023 Wishes: आयुर्वेद (Ayurveda) हे अंदाजे 5000 वर्षे जुने वैद्यकीय शास्त्र आहे. भारतातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय ज्ञान-विज्ञान लक्षात घेऊन भारतातील विद्वानांनी ते विकसित केले आहे. सध्या आयुर्वेद वैद्यकीय शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ (National Ayurveda Day) दरवर्षी धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंतीला साजरा केला जातो. यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी जगभरातील सुमारे 100 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे. 'आयुर्वेद फॉर वन हेल्थ' या थीमवर यंदाचा 'आयुर्वेद दिन' साजरा करणे हा जागतिक कार्यक्रम असेल आणि तो यशस्वी करण्यासाठी आयुष मंत्रालयाला देशातील सर्व मंत्रालयांचे सहकार्य मिळणार आहे.

‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ हा दिवस 2016 पासून साजरा केला जात असून यावर्षी 8 वा आयुर्वेद दिन धनत्रयोदशीला साजरा केला जात आहे. दरवर्षी धन्वंतरी जयंती आणि धनत्रयोदशी हे सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरे केले जातात, म्हणून राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याची तारीख दरवर्षी बदलत राहते. तरुण पिढीला उपचाराच्या आयुर्वेदिक तत्त्वांची ओळख करून देण्याच्या आणि त्याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे.

तर धनत्रयोदशी दिवशी खास Images, Messages, Wishes, WhatsApp Stickers, Greetings शेअर करून द्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा.

Happy National Ayurveda Day 2023 Wishes

Happy National Ayurveda Day 2023 Wishes
Happy National Ayurveda Day 2023 Wishes
Happy National Ayurveda Day 2023 Wishes
Happy National Ayurveda Day 2023 Wishes

दरम्यान, आयुर्वेद हा भारताच्या आरोग्य सेवा प्रणालींचा अविभाज्य भाग मानला जातो. या पारंपारिक उपचार पद्धतीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली आहे. जगातील सर्वात जुन्या वैद्यकीय प्रणालींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आयुर्वेदाचा उगम 5,000 वर्षांपूर्वीचा आहे. ही उपचार प्रणाली शरीर, आत्मा आणि मनामध्ये निरोगी जीवनशैली आणि आहाराचा सराव करण्यास प्रोत्साहित करते. आयुर्वेदिक औषधे मानवी शरीराला रोग आणि शारीरिक वेदनांपासून मुक्त ठेवण्यास मदत करतात. (हेही वाचा: Laxmi Pujan Muhurat 2023: 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन कधी करावं? पहा मुहूर्ताची वेळ)

धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेदाचे जनक आणि देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाले होते, त्यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरी यांची जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.