International Yoga Day 2020 | File Image

Happy International Yoga Day Marathi Wishes:  योग या शब्दाची निर्मिती 'युज्' या धातूपासून झाली आहे. युज् याचा अर्थ जोडणे. योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. भारतातील प्राचीन शास्त्र असलेल्या योगाची महती संपूर्ण जगाला पटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जावू लागला. 2015 पासून योग दिन साजरा केला जात असल्याने यंदा सहावा योग दिन साजरा होणार आहे. जागतिक योग दिनानिमित्त जगभरात अनेक योग कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा जगभरात असलेल्या कोविड-19 च्या धोक्यामुळे योगदिनाला साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. तरी योग दिनाचा उत्साह कमी होऊ नये म्हणून 'घरी योगा आणि कुटूंबासह योगा' (Yoga at Home & Yoga With Family) या थीमवर यंदाचा योगदिन साजरा केला जाणार आहे. (लहान मुलांसाठी योगसाधनेचे महत्त्व काय? योगसाधनेला सुरुवात करण्यासाठी उपयुक्त टिप्स)

तुमच्यापैकी अनेकजण योगाचे महत्त्व जाणतात. योग हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे देखील शास्त्र आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात शरीरासोबत मानसिक आरोग्य राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हीच बाब ध्यानात घेऊन यंदा कुटुंबासह योगदिन साजरा करा. त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य राखले जाईल यात वादच नाही. तसंच आपल्या मित्र-मैत्रिणींना, योगप्रमींना योगदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून म्हणजेच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप द्वारे देऊन तुम्ही योगदिनाचा उत्साह टिकवू शकता. त्यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटिंग्स, Wishes, Messages, Images आणि GIF's.

योगदिनाच्या शुभेच्छा!

निरोगी तन आणि शांत मन याची

गुरुकिल्ली म्हणजे योग

जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!

International Yoga Day 2020 | File Image

शरीर, मन आणि आत्मा

यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

International Yoga Day 2020 | File Image

योग असे जेथे

आरोग्य वसे तेथे

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

International Yoga Day 2020 | File Image

योग असे जेथे

रोग नसे तेथे

जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

International Yoga Day 2020 | File Image

नियमित योगा

सुदृढ आरोग्य उपभोगा

जागतिक योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

International Yoga Day 2020 | File Image

GIF's

 

via GIPHY

via GIPHY

योग ही स्लो प्रोसेस आहे म्हणजे योगाचे लाभ निरंतर साधनेनंतरच मिळतात. तरी देखील यशाशक्ती निरंतर साधना केल्यास शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक शांतता लाभते यात कोणतेच दुमत नाही. त्यामुळे योगाचे महत्त्व वेळीच जाणून योगसाधनेला सुरुवात करा. योगसाधनेमुळे सध्याच्या ताण-तणावयुक्त काळात फिट राहण्यास नक्कीच मदत होईल.