International Labour Day 2024 Wishes: आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Labour Day 2024) दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस कामगार आणि कामगार चळवळींच्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी कामगारांचे कौतुक केले जाते आणि त्यांच्या हक्कांसाठी जागृती केली जाते. तसेच कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला जातो. कामगार दिनाची मुळे 1886 मध्ये शिकागोमधील हेमार्केट दंगलीत आहेत, जेव्हा हजारो कामगारांनी 8 तास कामाचा दिवस आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्या काळात मजुरांना प्रत्येकी 15 तास सतत काम करायला लावले होते. तसेच आठवडाभरात एकही सुट्टी नव्हती. त्याचवेळी या दंगलीत कामगार आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली. निदर्शनांमध्ये सात पोलिस अधिकारी आणि किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे रोजी मे दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1894 मध्ये ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली. तेव्हापासून, या दिवशी अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी देखील साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, Images, SMS, Greetings, Quotes द्वारे तुमच्या सहकाऱ्यांना कामगार दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
हा दिवस जगभरातील कामगार एकता, समानता आणि सामाजिक न्यायासाठी साजरा करतात. भारतातील पहिला मे दिवस हिंदुस्थानच्या मजूर किसान पार्टीने 1923 मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे साजरा केला. 1962 मध्ये अल्जेरियाने 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला. भारतातील कामगार दिनानिमित्त विविध उत्सव, रॅली काढल्या जातात.