Happy Independence Day 2022 Wishes In Marathi: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करत साजरी करा स्वातंत्र्याची 76 वर्ष!
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

Independence Day 2022 Wishes:  भारत यंदा स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीमधून भारताने मोकळा श्वास घेतला. आज या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये सरकार कडून अनेक कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. 13-15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' मोहिम चालवली जात आहे. आकाशात डौलाने फडकणारा झेंडा पाहून प्रत्येकाचा ऊर भरुन येत आहे. मग या मंगल राष्ट्रीय उत्सवाचा आनंद सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस, Wishes, GIFs, HD Images, Greetings शेअर करत द्विगुणित करायला विसरू नका.

सोशल मीडीयामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठमोळी शुभेच्छापत्रं शेअर करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून बनवण्यात आलेली ही ग्रिटिंग्स तुम्ही नक्कीच डाऊनलोड करू शकता. नक्की वाचा: Independence Day Speech 2022: 15 ऑगस्ट निमित्त मुलांसाठी 'असे' तयार करा भाषण; प्रेक्षक करतील टाळ्यांचा वर्षाव.

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

ज्याचा मुकूट आहे हिमालय,

जिथे वाहते गंगा

जिथे आहे विविधतेत एकता..

‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारतदेश आमचा

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

बलसागर भारत होवो,

विश्वात शोभूनी राहो

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी माझा भारत देश घडविला!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

ज्यांनी लिहली आझादीची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या

खूप खूप शुभेच्छा!

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा । File Photo

विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला

via GIPHY

भारताचा स्वातंत्र्यदिन हा 15 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. त्यासोबतच राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून देशभक्ती व्यक्त केली जाते.