Happy Holi 2022 Wishes & HD Images: होळी हा एक भारतीय सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी साजरा केला जातो. होळीचा सण राधा कृष्णाच्या शाश्वत आणि दैवी प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. होळी उत्सवाच्या मुख्य दिवशी, लोक एकमेकांना रंग लावतात. सर्व वयोगटातील लोक पाण्याने भरलेले फुगे, रंग एकमेकांवर लावून या दिवसाचा आनंद लुटतात. तुम्हीदेखील या रंगीबेरंगी सणानिमित्त आपल्या मित्र-परिवाराला खास शुभेच्छा संदेश देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज उपयोगात येतील. तुम्ही हे संदेश डाउनलोड करून तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना 2022 च्या होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता.
होळीची तयारी होळीच्या एक दिवस आधी होलिका दहनाने सुरू होते. जिथे लोक एकत्र येतात आणि आगीसमोर विधी करतात. दैत्य राजा हिरण्यकश्यपची बहीण होलिका जशी आगीत मारली गेली, तशीच त्यांची आंतरिक दुष्टाई नष्ट व्हावी अशी ते प्रार्थना करतात. दुसऱ्या दिवशी लोक रंग खेळतात. खाली काही रंगेबीरंगी प्रतिमा आहेत ज्या आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या प्रियजनांना रंगांच्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - When Is Holika Dahan 2022? होलिका दहनाची तारीख, पूजेची वेळ, दंतकथा आणि सणाचे महत्त्व जाणून घ्या)
होळीच्या निमित्ताने अनेक लोक गुजिया तसेच थंडाई इत्यादीसारखे खास होळीचे पदार्थ तयार करतात. होळीचा सण साजरा करण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांना त्यांच्या घरी आमंत्रित करतात. या दिवशी विविध रेन डान्स पार्टी आयोजित केल्या जातात. येथे रंगीत प्रतिमा आणि सुंदर संदेश आहेत जे तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सर्व कुटुंबीयांना आणि मित्रांना होळी 2022 च्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता. सर्वांना होळी 2022 च्या शुभेच्छा!