Hartalika Tritiya 2022 Wishes in Marathi: हरितालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी हे व्रत मंगळवारी म्हणजेचं 30 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल राहून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी हे व्रत ठेवले होते. त्यानंतर भगवान शिव पार्वतीला पती म्हणून प्राप्त झाले होते. शास्त्रानुसार, अविवाहित मुलींनीदेखील हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांना इच्छित वरही मिळू शकतो.
हरितालिका तृतीया निमित्त Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून तुम्ही या पवित्र व्रताच्या शुभेच्छा आपल्या मैत्रिणींना देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Hartalika Tritiya 2022 Date: हरितालिका तृतीया कधी आहे? हरितालिका तृतीयाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा जाणून घ्या)
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

हरितालिका तृतीया सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

हरितालिका तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा!

माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही
मिळो मनाजोगता वर
हरितालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

हरितालिका तृतीयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

हरतालिका तीजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. असे म्हणतात की, हे व्रत भक्तीभावाने पाळल्याने देवी पार्वती अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. या दिवशी महिला देवी पार्वतीला सोळा शृगांराची सामग्री अर्पण करतात.