
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला महाराष्टासहित देशविदेशात श्रीगणरायाचे आगमन होणार आहे. हिंंदु धर्माचा हा सर्वात मोठा सण मानला जातो, बुद्धीची देवता, 64 कलांंचा अधिपती गणांंचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांंच्या भेटीसाठी येतो आणि मग पुढे 1, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग रजा घेतो, अशा साध्या आणि सुंदर स्वरुपाचा हा सण आहे. यंंदा कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक स्तरावर हा सण फार धामधुमीत साजरा होणार नाही मात्र यामुळे निराश होण्याची गरज नाही. घरगुती स्तरावर तुम्ही जोरदार सेलिब्रेशन करु शकता. अलिकडे सणा निमित्त ऑनलाईन शुभेच्छा देणंं आलंच त्यामुळे कोरोनाचं (Coronavirus) संंकट आणि गणेशोत्सव असं औचित्य लक्षात घेउन गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages तयार केलेले आहेत जे तुम्ही फक्त डाउनलोड करुन तुमच्या Whatsapp Status, Facebook वरुन शेअर करु शकता.
यंदा गणेशोत्सव हरितालिका, ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन कधी? जाणून घ्या तारखा!
गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा
अवघी सृष्टी करत आहे नमन
होत आहे बाप्पाचं आगमन
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा!

गौरीपुत्रा तु गणपती, ऐकावी भक्तांंची विनंंती
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय बाप्पा..
तुझा मंंडप असा शांत बघवत नाही रे
कोरोनाचं विघ्न लवकर संपव,
आम्ही तुला शरण येतो आमचं रक्षण कर

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

कोरोनाच्या संंकट काळात बाप्पा आपले रक्षण करो
अशा मनापासुन सदिच्छा
श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेशभक्तांंना
खुप खुप शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया
मंंगलमुर्ती मोरया

दरम्यान, प्लेगच्या साथीमुळे शंभर वर्षांपूर्वी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता.यानंंतर आता कोरोनाचे संकट लक्षात घेउन बाप्पाचे आगमन गाजावाजात होणार नाहीये, मात्र नाराज होऊ नका घरच्या घरी बाप्पाची मनोभावे पुजा करुन हा सोहळा साजरा करा. सुरक्षित राहा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा!