Friendship Day 2022: आयुष्यात अनेक नाती अशी असतात जी आपली इच्छा असो नसो. ती स्वीकारावीच लागतात. पण मैत्रिचे एकमेव नाते असे आहे जे आपण स्वत:हून निवडतो. त्यामुळेच जगात सर्वात घट्ट आणि अधिक मोकळेपणाचे नाते म्हणजे मैत्रिचे नाते असे मानले जाते. जगभरात प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (August First Sunday) फ्रेंडशिप डे साजरो केला जातो. यंदा 7 ऑगस्ट रोजी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो आहे. फ्रेंडशिप डे निमित्त अनेक लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही फ्रेंडशिप डे निमित्त आपल्या मित्राला शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी Wishes, HD Images, Greetings, Messages, SMS, WhatsApp Status इथून डाऊनलोड करु शकता.

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र भेटतात. काही बरे काही वाईट. काही घनिष्ठ काही नावापूरते. काही स्वार्थी काही निस्वार्थी. तर कधी जे मित्र भेटतात ते आयुष्याला पुरतात. हे मित्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक चड उतारात सोबत करतात. त्यामुळे अशा मित्रांची प्रत्येकाला गरज असते. हे मित्र कधी आपले मार्गदर्शक, कधी टीकाकार तर कधी स्तुथीपाठकही ठरतात. आयुष्यात अशाच मित्राची गरज असते. जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख, दुख: वाटून घेऊ शकेल. अशा या मित्राला शुभेच्छा देणे हे तर आपले कर्तव्यच ठरते ना?

आपल्या दोस्तात कोणकोणते गुण आहेत याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुमचा मित्र तुमच्या प्रति इमानदार आहे का? तो तुम्हाला तुमच्या गरजेवेळी तुमच्यासोबत उभा राहतो का? तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून तो प्रवृत्त करतो का? तुमच्या मित्राचे तुमच्यावर प्रेम आहे की तुमच्या पैशांवर? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा मग आपल्याला आपल्या मित्रांच्या गुणांबाबत अधिक माहिती कळू शकेल.